¡Sorpréndeme!

Udayanraje Bhosale | उदयनराजेंनी चालवली 'बोट' | Eknath Shinde | Tapola | Kaas | Sakal Media

2021-09-15 4,581 Dailymotion

Udayanraje Bhosale | उदयनराजेंनी चालवली 'बोट' | Eknath Shinde | Tapola | Kaas | Sakal Media
कास (सातारा) : भाजपचे राज्यसभेतील खासदार उदयनराजे भोसले यांनी आज राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Minister Eknath Shinde) यांच्या तापोळा विभागातील दरे गावी जाऊन भेट घेतली. त्यांच्या या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान, उदयनराजे भोसले यांनी दरे ते तापोळा या प्रवासादरम्यान अवजड आशा तराफ्याचे स्टेरिंग हातात घेतले. यावेळी बोलताना त्यांना विचारण्यात आले, की राजकारणातील स्टेरिंग अवघड जात आहे, की पाण्यातील स्टेरिंग अवघड वाटत आहे. यावर उदयनराजे म्हणाले, लोकांना योग्य दिशेला घेऊन जाणे माझे काम आहे. एकनाथ शिंदे यांच्या भेटीबाबत ते बोलले, की आमचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. लोकांची कामं व त्या अनुषंगाने त्यांच्या भेटीला जात असून यामध्ये काही विशेष नाही. तापोळा हा मिनी काश्मीर म्हणून ओळखला जातो येथील सौंदर्य व परिसरातील निसर्गा विषयी बोलताना खासदार उदयनराजे म्हणाले, लोकांनी विचार केला पाहिजे. निसर्ग जपला पाहिजे. निसर्गापुढे आपण खूप छोटे आहोत. ग्लोबल वाॅर्मिंगची समस्या वाढत आहे.. यासाठी पाणी आडवा पाणी जिरवा तसेच वृक्षारोपण याबाबतीत लोकांनी पुढाकार घ्यावा. (व्हिडिओ - सूर्यकांत पवार)
#Satara #UdayanrajeBhosale #EknathShinde #Tapola #Kaas